World Yoga Day 2021:योगासन म्हणजे काय, त्याचे किती प्रकार आहे जाणून घ्या

yoga day
Last Modified मंगळवार, 15 जून 2021 (19:26 IST)
21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जाणार .योगातील आसन काय आहेत, आसन कशाला म्हटले जाते, योगासनांचा मुख्य हेतू काय आहे, आसन आणि व्यायामामध्ये काय फरक आहे आणि हे किती प्रकारचे आहेत हे योग दिना निमित्त जाणून घ्या.
1 आसनाची व्याख्या- मनाला स्थिर ठेवणारे आणि सुख देणारे बसण्याच्या प्रकाराला आसन म्हणतात.आसन शब्द संस्कृतच्या 'अस' धातू पासून बनला आहे.याचे दोन अर्थ आहे -प्रथम म्हणजे बसण्याचे स्थान आणि दुसरे म्हणजे भौतिक अवस्था.

2 योगासनांचा मुख्य हेतू- या आसनांचा मुख्य हेतू म्हणजे शरीराच्या मळाचा नाश करणे आहे.शरीरातून मळ किंवा दूषित विकार नष्ट झाल्याने
शरीरात आणि मनात स्थिरता येते.शांतता आणि आरोग्यलाभ मिळतो.शरीर
हे मन आणि बुद्धीच्या साहाय्याने आत्म्याला सांसारिक बंधनातून योगाद्वारे मुक्त करू शकतो.शरीर हे महान विश्वाचे सूक्ष्म रूप आहे. म्हणून, जेव्हा शरीर निरोगी असते तेव्हा मन आणि आत्म्याला समाधान मिळत.
आसन ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. आपले शरीर स्वच्छ, शुद्ध आणि सक्रिय ठेवून ते एखाद्या व्यक्तीस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवतात.आसन हा एकमेव व्यायाम आहे ज्याचा आपल्या शरीरावर प्रभाव पडू शकतो.
3 आसन आणि व्यायाम- आसन आणि व्यायामात हाच फरक आहे की आसन शरीराची प्रकृती बनवून ठेवतात तर इतर प्रकाराचे व्यायाम ह्यात बिगाड करतात. जिमखाना किंवा आखाड्यात केले जाणारे व्यायाम हे
शरीरारा वर अतिरिक्त श्रमाचे परिणाम आहे.जे देखावासाठीच असतात.हे शरीरातील अतिरिक्त ऊर्जा नष्ट करतात.

4 आसनांचे प्रकार -बसून केले जाणारे आसन,पाठीवर झोपून केले जाणारे आसन,पोटावर झोपून केले जाणारे आसन,आणि उभे राहून केले जाणारे आसन.
1 बसून केले जाणारे आसन- पद्मासन, वज्रासन, सिद्धासन, मत्स्यासन, वक्रासन, अर्ध-मत्स्येन्द्रासन, गोमुखासन, पश्चिमोत्तनासन, ब्राह्म मुद्रा, उष्ट्रासन, गोमुखासन इत्यादी.

2 पाठीवर झोपून केले जाणारे आसन- अर्धहलासन, हलासन, सर्वांगासन, विपरीतकर्णी आसन, पवनमुक्तासन, नौकासन, शवासन इत्यादी.

3 पोटावर झोपून केले जाणारे आसन- मकरासन, धनुरासन, भुजंगासन, शलभासन, विपरीत नौकासन इत्यादी.
4 उभे राहून केले जाणारे आसन-ताड़ासन, वृक्षासन, अर्धचंद्रमासन, अर्धचक्रासन, दो भुज कटिचक्रासन, चक्रासन, पादहस्तासन इत्यादी.

इतर आसन -शीर्षासन, मयुरासन, सूर्य नमस्कार इत्यादी.

इतर प्रकार- 'आसनानि समस्तानियावन्तों जीवजन्तव:। चतुरशीत लक्षणिशिवेनाभिहितानी च।' अर्थात,जगातील सर्व जीव जंतूंच्या बरोबरीने या आसनांची संख्या सांगितली आहेत.अशा प्रकारे 84000 आसनांपैकी केवळ 84 आसन मुख्य मानले आहेत.त्यापैकी काही मुख्य आसनांचा वर्णन योगाचार्यानी आपापल्या पद्धतीने केला आहे.या आधारावर योगासनांना 6 भागात वाटले आहे.

1 पशुवत आसन -आसनाचा पहिला प्रकार ज्यामध्ये प्राणी आणि पक्ष्याच्या उठण्या आणि बसण्याच्या पद्धतीच्या आधारावर आहे.जसे -
1.वृश्चिक आसन, 2.भुजंगासन, 3. मयूरासन, 4. सिंहासन, 5. शलभासन, 6. मत्स्यासन 7.बकासन 8.कुक्कुटासन, 9.मकरासन, 10. हंसासन, 11.काकआसन 12. उष्ट्रासन 13.कुर्मासन 14. कपोत्तासन, 15. मार्जरासन 16.क्रोंचासन 17.शशांकासन 18.फुलपाखरासन 19.गौमुखासन 20. गरुड़ासन 21. खगआसन 22.चातक आसन, 23.उलूक आसन, 24. श्वानासन, 25. अधोमुख श्वानासन, 26.पार्श्व बकासन, 27.भद्रासन या गोरक्षासन, 28.कगासन, 29. व्याघ्रासन, 30. एकपाद राजकपोतासन इत्यादी .
2 वस्तुवत आसन- दुसऱ्या प्रकारचे आसन जे वस्तूंच्या प्रमाणे आहेत.जसे की -
1.हलासन, 2.धनुरासन, 3.आकर्ण अर्ध धनुरासन, 4. आकर्ण धनुरासन, 5. चक्रासन या उर्ध्व धनुरासन, 6.वज्रासन, 7.सुप्त वज्रासन, 8.नौकासन, 9. विपरित नौकासन, 10.दंडासन, 11.तोलंगासन,12.तोलासन, 13.शिलासन इत्यादी.

3 प्रकृती आसन-हे वनस्पती,झाडे,आणि निसर्गाच्या घटकांवर आधारित आहे.जसे की -
1.वृक्षासन, 2.पद्मासन, 3.लतासन, 4.ताड़ासन 5.पद्म पर्वतासन 6.मंडूकासन, 7.पर्वतासन, 8.अधोमुख वृक्षासन 9. अनंतासन 10.चंद्रासन, 11.अर्ध चंद्रासन 13.तालाबासन इत्यादी.
4 अंग किंवा मुद्रावत आसन- या मध्ये अंगांना बळकट करणारे आसन आहे.जसे -

1.शीर्षासन, 2. सर्वांगासन, 3.पादहस्तासन या उत्तानासन, 4. अर्ध पादहस्तासन, 5.विपरीतकर्णी सर्वांगासन, 6.सलंब सर्वांगासन, 7. मेरुदंडासन, 8.एकपादग्रीवासन, 9.पाद अंगुष्ठासन, 10. उत्थिष्ठ हस्तपादांगुष्ठासन, 11.सुप्त पादअंगुष्‍ठासन, 12. कटिचक्रासन, 13. द्विपाद विपरित दंडासन, 14. जानुसिरासन, 15.जानुहस्तासन 16. परिवृत्त जानुसिरासन, 17.पार्श्वोत्तानासन, 18.कर्णपीड़ासन, 19. बालासन या गर्भासन, 20.आनंद बालासन, 21. मलासन, 22. प्राण मुक्तासन, 23.शवासन, 24. हस्तपादासन, 25. भुजपीड़ासन इत्यादी.
5 योगिनां आसन- पाचवे त्या प्रकारचे आसन आहे.जे योगी किंवा ईश्वराच्या नावावर आहे.जसे की-
1.महावीरासन, 2.ध्रुवासन, 3. हनुमानासन, 4.मत्स्येंद्रासन, 5. अर्धमत्स्येंद्रासन,
6.भैरवासन, 7.गोरखासन, 8.ब्रह्ममुद्रा, 8.भारद्वाजासन, 10. सिद्धासन, 11.नटराजासन, 12. अंजनेयासन 13.अष्टवक्रासन,14. मारिचियासन (मारिच आसन) 15.वीरासन 16. वीरभद्रासन 17. वशिष्ठासन
इत्यादी.

6 इतर आसन-1. स्वस्तिकासन, 2. पश्चिमोत्तनासन, 3.सुखासन, 4.योगमुद्रा, 5.वक्रासन, 6.वीरासन, 7.पवनमुक्तासन, 8.समकोणासन, 9.त्रिकोणासन, 10.वतायनासन, 11.बंध कोणासन, 12.कोणासन, 13.उपविष्ठ कोणासन, 14.चमत्कारासन, 15.उत्थिष्ठ पार्श्व कोणासन, 16.उत्थिष्ठ त्रिकोणासन, 17.सेतुबंध आसन, 18.सुप्त बंधकोणासन 19. पासासन इत्यादी .
यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’ मार्फत घेण्यात ...

मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’ मार्फत घेण्यात येणाऱ्या एम.फील/ पीएच.डीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन अधिछात्रवृत्ती २०२१ चा त्वरीत लाभ घेण्याचे आवाहन
“छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF २०२०) करिता सन २०२०-२१ मध्ये ...

पुरण सैल झाले तर काय करावे

पुरण सैल झाले तर काय करावे
चण्याची डाळ जास्त वेळा चोळून धुवू नये. डाळ शिजवण्यापूर्वी दोन तास भिजत ठेवावी. कुकरमधून ...

श्रावणमध्ये या 5 वस्तूंचे सेवन करा, भरपूर ऊर्जा मिळेल

श्रावणमध्ये या 5 वस्तूंचे सेवन करा, भरपूर ऊर्जा मिळेल
पावसाळ्यात इतर हंगामाच्या तुलनेत पाचक प्रणाली कमकुवत होते. अशात उपवास करत असणार्‍यांनी ...

पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी या प्रकारे दूर करा

पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी या प्रकारे दूर करा
पावसाळा आपल्या पसंत असला तरी या हंगाम्याची सर्वात वाईट बाब म्हणजे कपड्यांना येणारी ...

Funny Friendship Day Status In Marathi फनी मैत्री दिन संदेश

Funny Friendship Day Status In Marathi फनी मैत्री दिन संदेश
चांगला दोस्त चिडला तर त्याला कधीच वाऱ्यावर सोडू नका कारण तो असा हरामी असतो ज्याला आपल्या ...