बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मे 2022 (21:56 IST)

योगासन- वृद्धापकाळापर्यंत चांगले आरोग्य आणि तारुण्य मिळविण्यासाठी या योगासनांचा समावेश करा

sthirata shakti yoga benefits
उत्तम आरोग्य आणि शरीराच्या तंदुरुस्तीसाठी दिनचर्यामध्ये योग-व्यायाम समाविष्ट करणे हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. योगासने तुमचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास, उर्जेची पातळी राखण्यास आणि वयानुसार वाढणार्‍या आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
 
दररोज योगासन केल्याने त्यांच्यातील ऊर्जेची पातळी वृध्दापकाळापर्यंत टिकून राहते. नियमितपणे योगासन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांपासून वाचू शकता.
 
या योगासनांचा नियमित सराव करून तुम्हाला तारुण्य उर्जा आणि वृद्धापकाळापर्यंत चांगले शारीरिक आरोग्य मिळू शकते.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 चालण्याची सवय लावा -
वॉक करणे म्हणजे चालण्याची सवय असणे हे  तुमच्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर व्यायाम आहे. चालण्याने शरीरातील स्नायू सक्रिय होऊन रक्ताभिसरण चांगले राहते. या दोन्ही परिस्थिती तुम्हाला वृद्धापकाळातील अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवू शकतात जसे की संधिवात, हाडे दुखणे, चालण्यात अडचण इ. चालण्याच्या सवयीमुळे रक्त गोठत नाही, जो अनेक गंभीर आरोग्य समस्यांमध्ये एक प्रमुख घटक मानला जातो. 
 
2 वृक्षासन योगाचे फायदे
लहानपणापासूनच वृक्षासन योग करण्याची सवय तुम्हाला नंतरच्या काळात गंभीर आरोग्य समस्यांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. वृक्षासनाचा सराव करण्याची सवय शरीराचे संतुलन सुधारण्यासाठी तसेच उत्तम समन्वय राखण्यासाठी उपयुक्त आहे. संतुलन सुधारण्यासाठी, स्नायूंना निरोगी ठेवण्यासाठी, शरीरातील रक्त परिसंचरण तसेच ऊर्जा आणि जोम राखण्यासाठी वृक्षासन योग हा तुमच्यासाठी खास योगासनांपैकी एक आहे. 
 
3 विरभद्रासन योगाचा सराव-
विरभद्रासन योग हा अनेक प्रकारे शारीरिक आरोग्यासाठी प्रभावी सराव मानला जातो. तुमचे खांदे, हात, पाय, घोटे आणि पाठ बळकट करण्यासोबतच  शारीरिक संतुलन आणि स्थिरता सुधारण्यातही याचे फायदे आहेत. रक्ताभिसरण आणि श्वसन सुधारण्यासाठी तसेच शरीरातील ऊर्जा पातळी राखण्यासाठी दररोज विरभद्रासन योगाचा सराव करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. लहानपणापासूनच या योगाभ्यासाची सवय लावल्यास वृद्धापकाळातील अनेक समस्यांचा धोका कमी करता येतो.