शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (15:33 IST)

महाराष्ट्रात कृषी विधेयकांची अंमलबजावणी करणार नाही - बाळासाहेब थोरात

केंद्र सरकारने संसदेत मंजूर करून घेतलेल्या कृषी विधेयकांवर आता राष्ट्रपतींचीही स्वाक्षरी झाली आहे. पण तिन्ही विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात करणार नाही असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. महाविकास आघाडीतले सहकारी पक्ष आमच्यासोबत असून चर्चा करून आम्ही रणनिती ठरवणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
 
काँग्रेसचे शिष्टमंडळ आज (28 सप्टेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू करण्यात येऊ नये यासंदर्भात काँग्रेसकडून राज्यपालांना निवेदन दिले जाणार आहे.
 
देशभरात काँग्रेसकडून मोदी सरकारच्या कृषी विधेयकांचा विरोध करण्यात येत असून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.