शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (11:17 IST)

अयोध्येतील कारसेवकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्याचा आरोप असलेल्या कारसेवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि राममंदिर आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या कारसेवकांना शहीदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेने सरकारकडे केली आहे.
 
सुप्रीम कोर्टाने मूळ जागेवर मंदिर बांधण्याचा आदेश दिल्यानंतर ही मागणी करण्यात आली असून या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या संदर्भात एक पत्र लिहिलं आहे.
 
या आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांना 'धार्मिक सेनानी' असं जाहीर करावं, त्यांना पेन्शन आणि इतर सोयीसुविधा द्याव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. तसंच आंदोलनातील मृतांच्या नावांची यादी करून ती अयोध्येत लावावी अशीही अखिल भारतीय हिंदू महासभेची मागणी आहे.