बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जुलै 2019 (10:11 IST)

खेळाडूंचा सन्मान करायला शिका- रवींद्र जडेजाचा मांजरेकरांना सल्ला

माजी खेळाडू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर आणि टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा यांच्यात ट्विटरवर खडाजंगी झाली.
 
कॉमेंट्रीदरम्यान टीम इंडियाच्या कामगिरीचं समीक्षण आणि टीकेवरून संजय मांजरेकर यांना सातत्याने ट्रोल्सना सामोरं जावं लागतं.
 
मात्र यावेळी टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने मांजरेकर यांना उद्देशून ट्वीट केलं आहे.
 
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर रवींद्र जडेजाला अंतिम संघात घ्यावं अशी चर्चा सुरू होती. हाच प्रश्न मांजरेकर यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, "बिट्स अँड पीसेस प्लेयर्सचा (थोडी बॅटिंग-थोडी बॉलिंग करणारे खेळाडू) मी चाहता नाही. वनडे क्रिकेटमध्ये जडेजाची भूमिका अशीच काहीशी आहे. टेस्ट मॅचेसमध्ये जडेजा स्पेशालिस्ट बॉलर म्हणून खेळतो. पण वनडेत मी संघात स्पेशालिस्ट बॅट्समन किंवा स्पेशालिस्ट स्पिनरला पसंती देईन
जडेजाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे ट्वीट करण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर 'संजू मंजू' हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.
 
दरम्यान, रवींद्र जडेजा यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच खेळलेला नाही. पण बदली खेळाडू म्हणून मैदानावर येत जडेजाने अफलातून फिल्डिंगचा नमुना सादर केला आहे.
 
संजय मांजरेकर वर्ल्ड कपसाठीच्या कॉमेंट्री पॅनेलचा भाग आहेत. याआधी टीम इंडियावर टीका केल्याप्रकरणी हर्षा भोगले यांच्यावर टीका झाली होती.