युग चांडकच्या मारेकऱ्यांना मरेपर्यंत जन्मठेप
नागपूरमधील आठ वर्षीय बालक युग चांडक याच्या खून प्रकरणातील आरोपी राजेश धन्नालाल दवारे आणि अरविंद अभिलाष सिंग यांची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली.
तसंच, आरोपींना मरेपर्यंत कारागृहात ठेवण्यात यावे आणि त्यांना 25 वर्षे कारावास भोगल्याशिवाय शिक्षामाफी देण्यात येऊ नये, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आलं.
कोणतेही परिश्रम न घेता झटपट श्रीमंत होण्याच्या उद्देशाने आरोपींनी युगचे 1 सप्टेंबर 2014 ला अपहरण केलं आणि खंडणी मागितली. पण प्रकरण अंगलट येत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी युगचा निर्घृण खून केला.
परंतु, कायद्यानुसार आरोपींना दुर्मिळातल्या दुर्मिळ घटनेतच फाशीची शिक्षा सुनावता येते आणि ही घटना या निकषात बसण्यामध्ये थोडक्यात कमी पडते, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने हा सुधारित निर्णय देताना नोंदवलं.