गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (10:38 IST)

'पंजाब केसरी' स्वातंत्र्यवीर लाला लाजपत राय

28 जानेवारी 2022 रोजी महान स्वातंत्र्यसेनानी लाला लाजपत राय यांची 157 वी जयंती आहे. त्यांच्या देशभक्तीसाठी त्यांना 'पंजाब केसरी' आणि 'लॉयन ऑफ पंजाब ' ही पदवी देण्यात आली.
 
लाला लाजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी पंजाबमध्ये झाला, त्यांचे वडील सरकारी शाळेत शिक्षक होते.
 
लाला लाजपत  राय हे 'लाल बाल पाल' या त्रिमूर्तीचे सदस्य होते. यामध्ये पंजाबचे लाला लाजपत राय, महाराष्ट्राचे बाळ गंगाधर टिळक आणि बंगालचे बिपिनचंद्र पाल यांचा समावेश होता. स्वातंत्र्यलढ्याची दिशा बदलण्यात या तिन्ही नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या तिघांनीही स्वदेशी चळवळीला बळ देण्यासाठी देशभरातील लोक एकत्र केले.
 
लाला लाजपत राय हिंदू सामाजिक सुधारणा, स्वतंत्र चळवळशी संबंधित होते. भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांचावर  लाला लाजपत राय यांच्या खूप प्रभाव होता. त्यांनी सायमन कमिशनचा तीव्र निषेध केला. लाहोरमधील सायमन कमिशनच्या निषेधादरम्यान, पोलिसांनी तिच्यावर लाठीचार्ज केला, या मध्ये ते गंभीर जखमी झाले, 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचा  मृत्यू झाला.