रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2019 (11:23 IST)

फक्त दोन लोकांनाच माहीत आहे की सलमानचे लग्न केव्हा होणार आहे : कॅटरीना कैफ

सलमान खानचे लग्न केव्हा होणार? हा प्रश्न बर्‍याचवेळा विचारण्यात येतो, पण अद्याप याचे उत्तम मिळालेले नाही आहे. सलमान खान आता या प्रश्नामुळे फारच बोर झाला आहे, पण हे प्रश्न वारंवार त्याच्यासमोर येत राहतात.  
 
सलमान खान लवकरच कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणार आहे. तिथे तो कॅटरीना कैफसोबत त्याचे येणारे चित्रपट 'भारत'च्या प्रमोशनासाठी येईल. हे चित्रपट ईदच्या प्रसंगी 5 जून रोजी रिलीज होणार आहे.  
 
सलमानच्या लग्नाबद्दलचा प्रश्न कैटरीना कैफला विचारण्यात आला. की सलमान लग्न केव्हा करणार आहे.? कैटरीनाने लगेच उत्तर दिले की या प्रश्नाचे उत्तर फक्त दोन लोकांना माहीत आहे. एकतर देव दुसरा सलमान.  
 
कैटरीनाच्या उत्तरामुळे सर्वांना हसू आले. कैटरीनाने स्पष्ट केले की सलमानच्या इच्छेवरच आहे की तो केव्हा लग्न करेल.  
 
महत्त्वाचे म्हणजे कैटरीना आणि सलमानचे नाव बर्‍याच वेळेपासून जुळलेले आहे, पण दोघांनी या गोष्टीला सार्वजनिकरीत्या कधीही स्वीकार केले नाही.  
 
चित्रपट भारतमध्ये सलमान आणि कैटरीनाची जोडी प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटाचे निर्देशन अली अब्बास ज़फर यांनी केले असून त्यांनी सलमानला घेऊन सुलतान आणि टायगर जिंदा है सारखे ब्लॉकबस्टर मूव्ही बनवले आहे.