राज्यात सोमवारी ५३६ नवीन करोनाबाधित आढळले
राज्यात सोमवारी ५३६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ८५३ रूग्ण करोनामधून बरे झाले आहेत. याशिवाय, २१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झालेली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८२,४९३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.७ टक्के एवढे झाले आहे.
आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,३४,९८० झाली आहे. राज्यात आजपर्यंत १४०९६२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,५४,२०,११७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,३४,९८० (१०.१४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८५,८०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १०२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ७,८५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत