शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 22 जुलै 2020 (09:23 IST)

राज्यात १ लाख ३२ हजार रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात मंगळवारी ७१८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.७२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ८२ हजार २१७ झाली आहे. दरम्यान मंगळवारी कोरोनाच्या ८३६९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३२ हजार २३६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १६ लाख ४० हजार ६४४ नमुन्यांपैकी ३ लाख २७ हजार ०३१ नमुने पॉझिटिव्ह (१९.९३ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ७९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात २४६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७५ टक्के एवढा आहे.