शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (15:29 IST)

पोस्ट Covid-19 रुग्णांमध्ये नवीन आजार उद्भवत आहेत, थेट तज्ञाकडून जाणून घ्या

-सुरभि‍ भटेवरा
 
कोविड-19 सारख्या गंभीर आजाराने रुग्ण बरे होत आहे. त्यानंतर त्यांना नवीन आजाराचा सामना करावा लागत आहे. कोविड -19 पासून बरे झाल्यानंतर लोकांमध्ये साइड इफेक्ट्स दिसून येत आहे.
 
अलीकडेच पुणे आणि नागपूरमध्ये असेच काही प्रकरणं समोर आले आहेत. ज्यात कोविडपासून मुक्त झाल्यावर त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहे. याचे नाव आहे म्यूकोमायकोसिस. परंतू हा आजार आहे तरी काय? कशा प्रकारे पसरतो? याचे दुष्परिणाम काय? लक्षणं काय आहे? याबद्दल माहिती देत आहेत डॉ भारत रावत-
 
डॉ भारत रावत यांनी सर्वात आधी म्हटले की आता कोणतंही औषधं डॉक्टरांच्या सल्लाशिवाय घेणे टाळावं’
 
प्रश्न - पोस्ट कोविड-19 चे नवीन लक्षणं दिसत आहे ज्याला म्यूकोरमाइकोसिस म्हटलं जात आहे, काय आहे हा आजार?
पोस्ट कोविडनंतर गंभीर आजार होत आहे त्याचं नाव म्यूकोरमाइकोसिस आहे. हे एका प्रकाराचं फंगल इंफेक्शन आहे. याची सुरुवात नाकापासून होते. नाकात सूज येत असल्यास किंवा वेदना जाणवत असल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क करा. नाकानंतर हे डोळ्यापर्यंत पोहचतं ज्याने डोळा गमावण्याचा धोका नाकारता येत नाही. हे मेंदूपर्यंत देखील पोहचू शकतं.
 
या फंगल इंफेक्शनची समस्या म्हणजे यावर सामान्य औषधांने उपचार संभव नाही. म्हणून योग्य वेळी डायगनोसिस होणे गरजेचे आहे. नाहीतर गंभीर परिणाम होऊ शकतात.
 
प्रश्न - पोस्ट कोविड-19 रुग्णांमध्ये ही लक्षणं समोर येत आहे- चेहर्‍यावर सूज, वेदना, नंबनेस, डोळ्यावर सूज, नाकातून हलक लाल आणि काळं किंवा ब्राउन डिस्चार्ज.
काही लक्षणं सामान्य असू शकतात ज्यात चेहर्‍यावर सूज, नंबनेस, ऑक्सीजन मास्क लावल्यामुळे उद्भवू शकतात. ऑक्सिजन मास्कमुळे चेहर्‍यावर प्रेशर पडतं याने सूज येते.
 
प्रश्न - स्टेरॉयडचे साइड इफेक्ट्स आहे का?
स्टेरॉयड वापरण्याचे नुकसान आहेत. स्टेरॉयड घेतल्याने ब्लड प्रेशर वाढणे, शुगर लेवल वाढणे, पोटात अल्सर होणे आणि म्यूकोरमाइकोसिस सह वेगळ्या प्रकाराचे इंफेक्शन होणे.
 
प्रश्न - स्टिरॉइडमुळे कोणत्या प्रकाराच्या फंगल इंफेक्शनचा धोका वाढत आहे?
अशी काही औषधे आहेत जी कोविडच्या उपचारात वापरली जातात. ज्याद्वारे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. कोरोनाचे काही धोकादायक कॉम्प्लेक्स देखील आढळतात. ते इम्यून रिएक्शनने देखील होतात. कोरोनामुळे होणार्‍या रिएक्शनला इम्यून रिएक्शन म्हणतात. त्यापासून बचावासाठी स्टिरॉइड दिलं जातं.
 
इम्यून रिएक्शन स्टिरॉइडने कमी केलं जातं. शरीरात काही इंफेक्शन असे असतात ज्यामुळे साधरणत: कोणताही धोका नसतो परंतू इम्यूनिटी कमी झाल्यामुळे इंफेक्शनचा धोका वाढतो. फंगल इंफेक्शन देखील त्या प्रकाराच्या इंफेक्शनपैकी आहे. ज्यांचा इम्युनिटी आधीपासून कमकुवत असणार्‍यांना याचा धोका अधिक असतो. डायबिटीज असणार्‍यांना, खूप दिवसांपासून स्टिरॉइड घेत असणार्‍यांना, अधिक प्रमाणात अँटी बायोटिक घेत असणार्‍यांना फंगल इंफेक्शनचा धोका अधिक असतो.
 
प्रश्न - मधुमेह रुग्णात स्टिरॉइड्स रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम करीत आहेत?
जर मधुमेहाच्या रुग्णाला स्टिरॉइड्स दिले जात असतील तर त्यांच्या शुगर लेवलची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणून डायबिटीज पेशेंटने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
प्रश्न - कोणता वय गट अधिक परिणाम पाहयला मिळत आहे?
म्यूकोरमाइकोसिस आजारापासून वयस्करांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण त्यांना साइड इफेक्ट्स लवकर होतात. वृद्ध लोकांमध्ये या आजाराचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
 
प्रश्न - पोस्ट कोविड केयर टिप्समध्ये रुग्णांनी काय फूड डायट फॉलो करणे गरजेचं आहे?
कोविड रुग्ण बरे झाल्यावरही काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य आहारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्नामध्ये प्रथिने समृद्ध वस्तूंचा समावेश करा. दिवसभरात किमान 2 ते 3 लिटर पाणी प्या.
 
मंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट केले होते
या आजाराची प्रकरणे यापूर्वीही नोंदली गेली आहेत. मुंबई, अहमदाबाद यानंतर राजस्थानमध्ये देखील 2020 मध्ये याचे केस समोर आले होते. त्या दरम्यान मंत्री अशोक गहलोत यांनी या आजाराबद्दल ट्विटही केले होते.
 
अहमदाबादमध्ये पहिल्यांदाच या आजाराच्या 44 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर दिल्ली, राजस्थान आणि मुंबईचा क्रमांक लागतो. सध्या पुणे आणि नागपुरात फंगल इंफेक्शनचे प्रकार समोर येत आहेत.