शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (16:28 IST)

चिंताजनक, राज्यात ३१ जिल्ह्यात सरासरी ४.२ लोकांनाच शोधले गेले

एका कोरोना रुग्णामागे संपर्कातील किमान २० लोकांना शोधण्याच्या आदेशाचे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. राज्यातील ३१ जिल्ह्यात सरासरी ४.२ लोकांनाच शोधण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.
 
राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील ३१ जिल्ह्यात आरोग्य विभागाने कोरोना रुग्ण संपर्कातील किती व्यक्ती शोधल्या याचा आढावा घेतला. तेव्हा ३१ जिल्ह्यात करोना रुग्णाच्या संपर्कातील सरासरी १० लोकांना शोधण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने २१ सप्टेंबर रोजी पुन्हा राज्यातील सर्व जिल्ह्यात रुग्ण संपर्कातील किती लोकांना शोधण्यात आले याची पाहाणी केली. या पाहाणीत गंभीर रुग्णांच्या ( हाय रिस्क) संपर्कातील सरासरी अवघे ४.६ लोकांचाच शोध घेतल्याचे, तर सौम्य लक्षणे असलेल्या ७.२ लोकांचा शोध घेण्यात आल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण आणखी कमी होऊन ४.२ टक्के एवढे झाले आहे. सातारा, सोलापूर, औरंगाबाद, चंद्रपूर, यवतमाळ आदी जिल्ह्यात एका करोना रुग्णामागे ४ ते ७.८ एवढेच संपर्कातील लोकांना शोधण्यात आल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते.