शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Updated : शनिवार, 23 मार्च 2024 (11:58 IST)

Summer Drink: घरातून निघण्यापूर्वी हे पेय करा सेवन, उन्हाच्या झळांपासून होईल रक्षण

भारतात उन्हाळ्याचे दिवस सुरु झालेत. उन्हाळ्यात आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या येतात. याशिवाय अति उन आणि उन्हाची झळ यांमुळे अनेक समस्या निर्माण होतात. आज आम्ही तुम्हाला एक अश्या एनर्जी ड्रिंक बद्द्ल सांगणार आहोत जे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. एवढेच नाही तर पोट दुखी, बद्धकोष्ठता आणि उल्टी यांसारख्या समस्या देखील या पेयामुळे कमी होतील. जाणून घेऊ या कैरीच्या पन्ह्याचे  फायदे. तसेच कैरीचे पन्हे  बनवण्याची कृती 
 
कैरीच्या पन्ह्याचे फायदे  
उन्हाच्या झळ्या पासून  रक्षण करते कैरीचे पन्हे. उन्हाळ्यात शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्सची खूप कमी भासते अशामध्ये हीट स्ट्रोक धोका वाढू शकतो. या स्थितीतून वाचण्यासाठी सोडियम, मैग्नीशियम आणि पोटेशियम यानी भरपूर असलेल्या कैरीच्या पन्ह्याचा एक ग्लास शरीरामध्ये  इलेक्ट्रोलाइट्सचे योग्य संतुलन बनवून ठेवण्यास मदत करतो. कैरीचे पन्हे इलेक्ट्रोलाइटच्या कमतरतेला  पूर्ण करून हीट स्ट्रोकपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. 
 
कैरीचे पन्हे पोटाच्या आरोग्यासाठी आहे वरदान 
कैरीच्या पन्ह्यामध्ये एल्डिहाइड आणि ईस्टरस सारखे एक्टिव इंग्रीडिएंट्स असतात. जे शरीराच्या पाचन तंत्रला चांगले बनवायला मदत करते. पन्ह्यामध्ये विटामिन सी आणि विटामिन बी आतड्यांच्या स्वच्छतेसाठी मदत करते. याशिवाय बद्धकोष्ठता आणि एसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. एवढेच नाही तर योग्य प्रमाणात पन्ह्याचे सेवन केल्यास हे बद्धकोष्ठता होण्यापासून रक्षण करते. 
 
कैरीचे पन्हे बनवण्याची कृती 
कैरीचे पन्हे बनवण्यासाठी कैरीला शिजवून घ्यावे. आता साल काढून गाठी बारीक करून घ्या. मिक्सरमध्ये बारीक करतांना त्यामध्ये पुदिन्याची काही पाने, भाजलेले जीरे आणि सेंधव मीठ घालावे. मग यामध्ये थोडेसे पाणी, बर्फ, मीठ, साखर आणि 1 लिंबाचा रस घालावा मग  हे चांगले मिक्स करून सेवन करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik