शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By वेबदुनिया|

आंब्याचे मोदक

साहित्य : अर्धा किलो ताजा खवा, पाव किलो आंब्याचा मावा (आटवलेला गोळा), दोन वाट्या पिठीसाखर, एक टी.स्पून वेलचीपूड.

कृती : खवा मंद आचेवर भाजून त्यात पिठीसाखर आणि आंब्याचा मावा मिसळावा. मिश्रण घट्टसर होईपर्यंत परतावं. गार झाल्यावर वेलचीपूड मिसळून साच्यात भरून मोदक करावेत.