मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

भाजीचे मुठिया

साहित्य : पाऊण किलो चण्याच्या डाळीचे पीठ, कोबी पाव किलो, दुधी भोपळा पाव किलो, गाजरे पाव किलो, ओल्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, ओले खोबरे, तीळ, मोहरी, मेथी, जिरे, हिंग, हळद, धने, लिंबू, साखर.

कृती: भाज्या धुऊन किसाव्यात. चण्याच्या पिठात किसलेल्या भाज्या घालाव्यात. तसेच ओल्या मिरच्या वाटून, कोथिंबीर, धन्या-जिर्‍याची पूड, हळद, साखर व मीठ हे सर्व जिन्नस अंदाजाने व चवीपुरते घालावेत. लिंबाचा रस पिळावा व जरूर लागल्यास थोडे पाणी घालून पीठ भिजवावे आणि थोडे तेल घालून पीठ चांगले मळावे. नंतर पिठाचे लहान लहान मुटके करून, मोदकपात्रात ठेवून, उकडून घ्यावेत. थंड झाल्यावर त्यांचे जाड काप कापावेत. हिंग, मोहरी व मेथीची फोडणी करून ती त्या कापांवर घालावी. काप खाली-वर करून फोडणी सगळीकडे लागेल, असे करावे. नंतर यावर कोथिंबीर व खोबरे पसरावे.