मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (13:27 IST)

Mahabharat: भीमाने संकटकाळात हनुमानजींनी दिलेल्या 3 केसांचे काय केले?

Mahabharat: एका कथेनुसार, हनुमानजी भीमावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला आपले तीन केस उपटून दिले आणि मोठ्या संकटाच्या वेळी ते वापरण्यास सांगितले. भीमाने हे तीन केस स्वत:जवळ सुरक्षित ठेवले, पण संकटकाळी त्यांचा वापर केला की नाही. जर केले तर कशाप्रकारे ? संपूर्ण कथा जाणून घ्या- 
 
हा तो काळ होता जेव्हा पांडवांनी युद्धात कौरवांवर विजय मिळवला होता आणि हस्तिनापुरात पांडव सुखी जीवन जगत होते. युधिष्ठिराच्या राजवटीत जनतेला कशाचीही कमतरता नव्हती. पौराणिक कथांनुसार, एके दिवशी देवऋषी नारद मुनी महाराज युधिष्ठिर यांच्यासमोर हजर झाले आणि म्हणाले की तुम्ही सर्व पांडव येथे सुखाने रहात आहात, परंतु तुमचे वडील स्वर्गात खूप दुःखी आहेत. देवऋषींचे असे बोलणे ऐकून युधिष्ठिराने याचे कारण विचारले, तेव्हा देवऋषी म्हणाले, 'त्यांना जिवंत असताना राजसूय यज्ञ करायचा होते पण ते करू शकले नाही, त्यामुळे ते दुःखी आहे. महाराज युधिष्ठिर, तुमच्या वडिलांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तुम्ही हा यज्ञ करावा.
 
नारदजींचे असे शब्द ऐकून युधिष्ठिराने वडिलांच्या आत्म्याच्या शांतीसाठी राजसूय यज्ञ करण्याची घोषणा केली. यासाठी नारदजींच्या सांगण्यावरून त्यांनी भगवान शिवाचे परम भक्त मृग ऋषींना आमंत्रित करण्याचे ठरवले. ऋषीपुरुष मृगा जन्मपासून अर्ध पुरुष शरीर आणि पाय खालून हरणासारखे असे होते, परंतु ते कोठे राहतात हे कोणालाही माहिती नव्हते.
 
पौराणिक कथेनुसार, अशा परिस्थितीत युधिष्ठिराने त्यांना शोधून त्यांना यज्ञाला आमंत्रित करण्याची जबाबदारी भीमावर सोपवली. आपल्या मोठ्या भावाच्या आज्ञेनुसार भीम मृग ऋषींचा शोध घेण्यासाठी निघाला. शोधता शोधता घनदाट जंगलात पोहोचला. जंगलात फिरत असताना भीमाला वाटेत हनुमानजी दिसले ज्याने भीमाच्या अभिमानाचा चक्काचूर केला. तुम्हाला ही कथा आधीच माहित आहे.
 
भीम हा देखील पवनचा पुत्र आहे, म्हणून भीम हा हनुमानजीचा भाऊ झाला. भीमाने लेटलेल्या अवस्थेत असलेल्या हनुमानजीला वानर मानले आणि त्यांची शेपूट काढण्यास सांगितले. तेव्हा हनुमानाने त्याला आव्हान दिले आणि सांगितले की जर त्याला शेपूट काढता येत असेल तर तसे करुन दाखव, पण भीमाला शेपूटही हलवता आले नाही. तेव्हाच त्यांच्या लक्षात आले की हे काही सामान्य वानर नाही. हे वानर दुसरे कोणी नसून हनुमानजी होते. हे जाणून भीमाने हनुमानजींची क्षमा मागितली.
 
भीमाने हनुमानजींना जंगलात भटकण्याचा उद्देश सांगितला. थोडा विचार करून हनुमानजींनी आपल्या शरीरातील 3 केस भीमाला दिले आणि सांगितले की, ते आपल्याजवळ ठेवा, ते त्याला संकटसमयी उपयोगी पडतील.
 
भीमाने या तीन केसांचे काय केले?
भीमाने हनुमानजींचे ते तीन केस स्वतःकडे सुरक्षित ठेवले आणि ऋषी मृगाचा शोध घेण्यासाठी निघाले. काही अंतर चालून गेल्यावर भीमाला महादेव शिवाची स्तुती करणारे शिवभक्त मृगा आढळले. भीम त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना नमस्कार करुन येण्याचे प्रयोजन सांगितले. यावर मृग ऋषींनीही त्यांच्यासोबत जाण्यास होकर दिला परंतु त्यांनी एक अट घातली.
 
त्यांनी म्हटले की तू माझ्या आधी हस्तिनापूरला पोहोच, अन्यथा मी तुला खाईन. थोडा वेळ विचार करून भीमाने मृग ऋषींची अट मान्य केली. अट मान्य करून तो सर्व शक्तीनिशी हस्तिनापूरकडे धावू लागला.
 
मृग ऋषी किती मागे आहे हे बघण्यासाठी भीमाने जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा त्याला दिसले की ऋषी त्याला पकडणार होते. हे पाहून भीमाला धक्काच बसला आणि तो सर्व शक्तीनिशी वेगाने पळू लागला. पण प्रत्येक वेळी त्याने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला ऋषी मृगा त्याच्या अगदी जवळ दिसले.
 
अशा प्रकारे भीमाला तीन केसांनी वाचवले
धावत असताना भीमाला हनुमानजींनी दिलेले ते तीन केस आठवले. हनुमानजी म्हणाले होते की, हे संकटाच्या वेळी तुम्हाला उपयोगी पडतील. धावताना भीमाने त्यातील एक केस जमिनीवर फेकला. ते केस जमिनीवर पडताच त्याचे लाखो शिवलिंगात रूपांतर झाले.
 
भगवान शिवाचे निस्सीम भक्त असल्याने, ऋषी मृगाच्या मार्गात आलेल्या प्रत्येक शिवलिंगाला नमस्कार करून पुढे जाऊ लागले. त्यामुळे भीमाला लांब पळण्याची संधी मिळाली. कुंतीचा मुलगा भीम पळत राहिला. मग जेव्हा भीमाला वाटले की ऋषी आपल्याला पुन्हा पकडतील तेव्हा त्याने पुन्हा एक केस सोडला आणि त्या केसाचे रूपांतर अनेक शिवलिंगांमध्ये झाले. अशाप्रकारे भीमाने हे तीनदा केले.
 
शेवटी भीमाला पुरुष मृगाने पकडले
शेवटी, भीम हस्तिनापूरच्या दरवाज्यात प्रवेश करणार होता, तेव्हा मृग ऋषी त्याला पकडण्यासाठी धावले आणि त्यांनी नुकतेच त्याला पकडले, तेव्हा भीमाने उडी मारली आणि त्याचे फक्त पाय दरवाजाबाहेर राहिले. यावर पुरुष मृगाने त्यांना पकडून खाण्याची इच्छा केली. पण त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर दारात पोहोचले. त्या दोघांना पाहून युधिष्ठिरही पुरुष मृगाशी वाद घालू लागला. तेव्हा पुरुष मृगाने युधिष्ठिरांना सांगितले की, स्थितीनुसार त्याचा पाय दरवाजाच्या बाहेर आहे त्यामुळे तो पोहोचू शकत नाही. अशावेळी मी त्याला खाईन. तरीही हे धर्मराज ! तुम्ही निवाडा करायला मोकळे आहात.
 
असे शब्द ऐकून युधिष्ठिर मृग ऋषींना म्हणाले की, भीमाचे फक्त पाय दाराबाहेर राहिले आहेत, बाकीचे संपूर्ण शरीर दाराच्या आत आहे, त्यामुळे तुम्ही फक्त भीमाचे पाय खाऊ शकता. हे ऐकून मृग ऋषी युधिष्ठिराच्या न्यायाने प्रसन्न झाले आणि त्यांनी भीमाला जीवनदान दिले. यानंतर ऋषींनी यज्ञ केला आणि सर्वांना आशीर्वादही दिला.