बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: बुधवार, 1 ऑगस्ट 2018 (14:54 IST)

प्रियांकाने नवा हॉलीवूडपट स्वीकारला

प्रियांका चोप्राने सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट निक जोनासबरोबरच्या लग्नासाठी सोडला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र आता तिने‘भारत’ सोडताच तिने एक नवा हॉलीवूडपट स्वीकारला आहे. ‘काऊबॉय निंजा वायकिंग’ नावाच्या या हॉलीवूडपटात ती ख्रिस पॅटसमवेत झळकणार आहे.
 
‘बेवॉच’मधून हॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर प्रियांकाकडे अनेक हॉलीवूडपट आले आहेत. अलीकडेच तिचा ‘अ किड लाईक जेक’ प्रदर्शित झाला. आता तिचा ‘इजंट इट रोमँटिक’ हा रिबेल विल्सनबरोबरचा रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे.