गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 2 एप्रिल 2023 (16:52 IST)

मेक्सिकोमध्ये हवेत उडणाऱ्या हॉट एअर बलून ला आग, पर्यटकांनी आकाशातून उड्या टाकल्या

मेक्सिकोतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक हॉट एअर फुगा हवेत उडत असून त्याला अचानक आग लागली. दरम्यान, काही लोक जीव वाचवण्यासाठी फुग्यावरून खाली उडी मारताना दिसत आहेत. प्रादेशिक सरकारने सांगितले की ही घटना शनिवारी, 1 एप्रिल रोजी मेक्सिको सिटीजवळील प्रसिद्ध टिओतिहुआकान पुरातत्व स्थळाजवळ घडली. या अपघातात आगीमुळे दोघांचा मृत्यू झाला.  
या अपघातात पर्यटकांनी हवेत उडी टाकली या अपघातात एक चिमुकला होरपळून निघाला त्याचा उजवा पायही फ्रॅक्चर झाला आहे. 
 
हॉट एअर बलूनमध्ये किती प्रवासी होते हे सध्या स्पष्ट झालेले नाही. 
हवेच्या फुग्याला आग लागल्याचे समजताच अनेक पर्यटकांनी त्यातून उड्या मारल्या. 
टियोटिहुआकन हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, ज्याचा सूर्य आणि चंद्राचा पिरॅमिड आणि त्याचा अव्हेन्यू ऑफ डेड आहे. 
 
Edited by - Priya Dixit