1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 16 मार्च 2019 (17:40 IST)

नाराज खोतकर यांच्या सोबत पंकजा मुंडे मात्रोश्रीवर राजकीय चर्चेला सुरुवात

लोकसभा निवडणूकीत जालन्याच्या जागेवरुन निवडणुक लढवण्याबाबत, मातोश्री येथे नाराज नेते आणि भाजपा चे रावसाहेब दानवे यांचे कडे विरोधक अर्जून खोतकर यांची उद्धव ठाकरे सोबत बैठक झाली आहे. बैठकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडेदेखील उपस्थित राहिल्या आहेत. बैठक संपवून जेव्हा बाहेर पडल्यावर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, की उद्धव ठाकरे यांच्यासोबतची ही भेट ही राजकीय स्वरुपाची नाही, आमचे चांगले संबंध असून, मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला आज आले होते. त्यांना मी सभांच्या संदर्भात निमंत्रण दिले आहे, त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेऊन आता निघाले आहे.’झालेली बैठक जालना मतदार संघा बाबत अजिबात नसून, आज सीट्स घोषित झाल्यावर कळेल कोणत्या जागांवर कोण उभे राहणार आहे, पंकजा यावेळी म्हणाल्या. 
 
पंकजा मुंडे या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमधील समन्वयक आहेत. तर पंकजा यांच्यापाठोपाठ काही वेळानेच अर्जुन खोतकरही मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे यांना भेटले आणि  बाहेर आले. खोतकर म्हणाले की जालनातून लढण्याचा माझा प्रस्ताव पक्षप्रमुखांना दिलाय. मात्र सध्या मातोश्रीवरील आजच्या बैठकीतून काहीच ठोस तोडगा निघाला नसून, जालना प्रश्न अजूनतरी न सुटलेला तिढा आहे. खोतकर यांनी जर दानवे यांना जालना येथे मदत केली नाही तर दानवे यांना निवडणूक लढवताना मोठ्या अडचणी येतील आणि मते सुद्धा कमी पडतील असे चित्र आहे.