बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2019 (08:34 IST)

शिंदे यांच्या विरोधात नाही, तर भाजपच्या विरोधात : आंबेडकर

सोलापुरात आपली लढत सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात नाही, तर भाजपच्या विरोधात आहे, असे नमूद करताना लोकसभा मतमोजणी होईल तेव्हा शिंदे हे तिसऱ्या स्थानावर फेकले जातील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
 
सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकरांच्या नातवाने एमआयएमसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर आघाडी करून लोकशाहीचा आणि राज्य घटनेचा खून केला आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता, त्याकडे लक्ष वेधले असता आंबेडकर यांनी त्या आरोपाला बेदखल केले. अशा टीकेला उत्तर देण्याचे कारण नाही. आपण कामानेच टीकेला उत्तर देण्याचे ठरविल्याचे त्यांनी सांगितले.