गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 एप्रिल 2019 (09:18 IST)

कॉंग्रेससाठी रितेश मैदानात भाजपवर टीका म्हणाला ५६ इंचाचे तर गोदरेजचे कपाट येते

लोकसभेचे वारे जोरदार वाहत असून पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. त्यात स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. रितेश म्हणाला की देश चालवायला 56 इंच छाती लागते मात्र ५६ इंचाचे तर गोदरेजचे कपाट येते. अशी जोरदार टीका केली आहे. लातूर येथे काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना रितेश देशमुख यांनी भाजपाला विशेषत: नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे . सध्या सोशल मिडीयावर अभिनेता रितेश देशमुखचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीयो मध्ये रितेश देशमुख म्हणतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात देश चालवायला ५६ इंचाची छाती लागते. मात्र ५६ इंचाचे तर गोदरेजचे कपाट येते. देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही चांगले हृदय लागते असं रितेश देशमुख यांनी सांगितले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर आहे.  सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभेत रंगत आणली असून आमदार अमित देशमुख यांचे बंधू अभिनेता रितेश देशमुखही आज लातूर येथे काँग्रेसच्या मेळाव्यात उपस्थित राहत प्रचारात सहभाग घेतला होता. लातूर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र २०१४ साली भाजपा खासदार निवडणून आला आणि देशमुख यांच्या सत्तेला जोरदार हादरा बसला होता.