अभिनेते आलोकनाथ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप
अभिनेते आलोकनाथ यांच्यावर १९९४ मध्ये गाजलेल्या 'तारा' या मालिकेच्या लेखिका असणाऱ्या विनता नंदा यांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे. विनता नंदा यांनी फेसबुकवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी कुठेच आलोकनाथ यांच्या नावाचा उल्लेख केला नसला तरीही एकंदर पोस्ट आणि विनता यांच्यासोबत करण्यात आलेला दुर्व्यवहार पाहता त्यांना नेमके कोणावर आरोप करायचे आहे, हे पोस्ट वाचणाऱ्यांच्याही लक्षात येत आहे. दरम्यान, विनता यांनी ती पोस्ट लिहिल्यानंतर 'सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन' म्हणजेच 'सिंटा' आलोकनाथ यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.