रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मे 2018 (15:06 IST)

जीएसटी आणि वाढती महागाई मुळे ५० विदेशी हॉटेल्स बंद

जीएसटी सोबत रोज वाढत असलेली महागाई याची मोठी झळ छोट्या उद्योगांनाच बसली असं चित्र नाही तर त्यांध्ये हॉटेल उद्योगाला देखील त्याचा मोठा फटका बसला असे समोर येते आहे. या करप्रणालीमुळे हॉटेल, रेस्टोरंट उद्योगाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. वर्ष भरात प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे असे समोर आले आहे. त्यांची आर्थिक उलाढाल २०१५ च्या स्तरावर पोहोचली असून अनेकांनी त्यामुळे व्यवसाय बंद केले आहेत. मागील १२ महिन्यांमध्ये सुमारे ५० मोठे हॉटेल्स नामांकित रेस्टोरंट बंद झाल्याची माहिती इंडिया टूडे ग्रुपच्या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे. काही प्रमुख कारण आहे जसे की हॉटेल आणि रेस्टोरंटमधून इनपुट टॅक्स परत घेणे, वाढलेली महागाई आणि बाजारातील प्रचंड स्पर्धा यामुळे हॉटेल्स चेन संकटात सापडल्या आहेत. तसेच खाद्य पदार्थ घरपोच देणारे अनेक स्पर्धक बाजारात आल्यानं हॉटेल-रेस्टोरंटकडे वळणारा वर्ग कमी झाला आहे. त्यामुळे हॉटेल चालवणे जिकरीचे झाले आहे. सोबत बाजारात वाढत्या किंमती यामुळे नफा काय हॉटेल चालवणे अवघड झाले आहे त्यामुळे हॉटेल बंद करणेच पसंत केले आहे.