मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑक्टोबर 2018 (09:28 IST)

ही तर अफवा, एमडीएच मसालेकडून खुलासा

एमडीएच मसाला कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाची बातमी खोटी असून ही निव्वळ अफवा असल्याचे त्यांच्या कुटुबीयांनी सांगितले आहे. तसेच एमडीएचकडून एक व्हिडीओ जारी करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये स्वतः धर्मपाल गुलाटी असून त्यांच्यासोबत नातेवाईक आणि सहकर्मचारी उपस्थित आहेत. 
 
व्हिडीओची सुरूवात गायत्री मंत्राने होते आणि गुलाटी यांनी हात वर करून आपली प्रकृती उत्तम असल्याचे सांगतात. तर व्हिडीओत गुलाटी यांचा सहकर्मचारी माहिती देतो की, “आम्ही आमच्या कार्यालयात बसलो आहोत. धर्मपाल यांची प्रकृती ठीक असून त्यांच्या निधनाची बातमी ही अफवा आहे. सोशल मीडियावर नेहमी अफवा पसरवल्या ज्यातात त्याचा गैरफायदा घेतला जातो. हा व्हिडीओ शेअर करून लोकांना कळवा की धर्मपालजी हे ठणठणीत आहे. जेणेकरून अफवा पसरणार नाही. तसेच गुलाटी यांना पुढे भरपूर काम करायचे आहे.”त्यांना उदंड आयुष्य लाभो ही देवाचरणी प्रार्थना त्यांच्या सहकर्मचार्‍यांनी व्हिडीओच्या शेवटी केली.