गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018 (17:17 IST)

शांततेच्या नोबेल पुरस्‍काराची घोषणा

डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना २०१८ सालच्या शांततेच्या नोबेल पुरस्‍काराने सन्‍मानित करण्यात आले आहे. युद्धांमध्ये लैंगिक हिंसाचाराचा शस्‍त्र म्‍हणून वापर करण्याच्या विरोधातील त्यांच्या प्रयत्‍नांसाठी हा पुरस्‍कार देण्यात आला. 
 
डेनिस हे आफ्रिकी देश डेमॉक्रेटिक रिपब्‍लिक ऑफ कांगो येथील आहेत.  डेनिस यांनी संपूर्ण जीवनभर युद्धात लैंगिक अत्याचाराला बळी ठरलेल्या लोकांचे रक्षण केले.
 
 नादिया मुराद या इराकमधील अल्‍पसंखय यहुदी समाजातील आहेत. त्यांना दहशतवाद्यांनी पकडले होते. तसेच त्यांच्यावर अनेकदा दहशतवाद्यांनी लैंगिक अत्याचार केले. कित्येकदा जबरदस्‍ती होऊनही त्या डगमगल्या नाहीत आणि सर्वोच्‍च बहादुरी दाखवल्याने त्यांना नोबेल देण्यात येत असल्याचे समितीने म्‍हटले आहे.