गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018 (09:01 IST)

डॉ. कोहोक यांची मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७ म्हणून निवड

नुकत्याच अमेरिकेत झालेल्या ग्लोबल युनायटेड पिजंट स्पर्धेत नाशिकच्या डॉ. नमिता कोहोक यांना ग्लोबल युनायटेड लाइफटाइम क्वीन हे नामांकन मिळाले आहे. अमेरिकेतील मिनीसोटा, मिनेपॉलीस येथे ही स्पर्धा पार पडली होती. डॉ. कोहोक यावर्षी ५१ देशांमधुन नामांकन मिळवून लाइफटाइम क्वीन बनल्या असून देशासाठी आणि नाशिकसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
 
ग्लोबल युनायटेड पिजंट ही स्पर्धा एका आगळ्यावेगळ्या कारणासाठी जगात प्रसिद्ध  असून, स्पर्धेत भाग घेणाऱ्या जगभरातील सौंदर्यवती या स्वत: कॅन्सरवर मात केलेल्या असतात. त्या कॅन्सर जनजागृतीचे काम अविरत  करतात. डॉ. नमिता कोहोक यांची २०१७ साली मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७ म्हणून निवड करण्यात आली होती. डॉ. नमिता कोहोक यांच्या मुळेच भारतात प्रथमच हा मोठा सन्मान मिळाला होता. जगातील कॅनडा, मलेशिया, अमेरिका अशा देशांमधुन त्यांची निवड झाली आहे.