गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (12:29 IST)

केरळ : हा शेतकरी महागड्या कारमधून भाजी विकायला येतो

social media
देशाच्या अनेक भागात अनेक तरुण शेतीसाठी पुढे येऊ लागले आहेत. त्यापैकी एक शेतकरी आहे जो ऑडी A4 सेडानमध्ये भाजी विकायला येतो. होय, एका तरुण शेतकऱ्याचा व्हिडिओ समोर आला आहे जो ऑडी ए4 सेडानमधून खाली उतरून रस्त्याच्या कडेला भाजी विकताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हरायटीच्या एका शेतकऱ्याने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक शेतकरी आपल्या शेतात पालेभाज्यांची लागवड करताना दिसत आहे. 
 
सध्या केरळ मधील एका शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा शेतकरी महागड्या ऑडी कार मधून आला आणि भाजी विकू लागला. सुजित एस पी असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्याला सोशल मीडियावर व्हेरायटी फार्मर म्हणून ओळखतात. नाविन्यपूर्ण शेती तंत्र, विविध प्रकाराची पिके घेणे आणि शेतीमध्ये एकात्मिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी त्यांना ओळखतात. आता संदीप हे महागड्या ऑडी कार मधून भाजी विकायला आल्यामुळे चर्चेत आले आहे. या महागड्या कारची किंमत सुमारे 44 लाख असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये संदीप ऑडीमध्ये बसून भाजी विकण्यासाठी रस्त्याच्या कडेला बाजारात पोहोचून जमिनीवर चटई घालून त्यावर भाजी सजवतात आणि विकू लागतात. पोस्टच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे जेव्हा मी पालक विकण्यासाठी ऑडी चालवली. 
 
हा व्हिडीओ तब्बल 76 लाख हुन अधिक लोकांनी बघितला असून त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले आहे. 
 
 
 


Edited by - Priya Dixit