राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचाराला येणार, तर प्रियांका गांधी यांच्या सुद्धा सभा
अखेर महाराष्ट्र विधानसभेसाठी राहुल गांधींच्या प्रचार सभेची तारीख ठरली आहे. या 13 ऑक्टोबरला राहुल गांधींची मुंबईत सभा होणार आहे. तर त्यासोबतच 14 आणि 15 ऑक्टोबरला सोनिया गांधी महाराष्ट्रात सभा होणार आहे. तर 16 ऑक्टोबरला प्रियांका गांधी नांदेडमध्ये सभेला संबोधित करणार आहे.
निवडणुकीच्या कालावधीत राहुल गांधी प्रचार करत नाहीत त्यामुळे अनेक नेते नाराज झाले होते, तर परदेशात सुट्टीला गेलेल्या राहुल यांच्यामुळे कॉंग्रेसवर सर्वांनी टीका केली होती. मात्र राहुल गांधी राज्यात सभा घेणार असून, सोबत प्रियांका गांधी सुद्धा असणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीला थोडे तरी बळ मिळेल असे चित्र आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा संभाळत जोरदार प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे भाजपा सध्या तरी आघाडीवर आहे. सोबतच उद्धव ठाकरे यांनी देखील शिवसेनेचा जोरदार प्रचार सुरू केला आहे.