बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (08:30 IST)

डागरहित आणि चकाकती त्वचेसाठी या टिप्स अवलंबवा

सुंदर आणि नितळ त्वचा प्रत्येकाला हवी असते.त्या साठी सर्व प्रकाराचे प्रयत्न देखील केले जाते.जर आपल्याला देखील नितळ आणि स्वच्छ त्वचा मिळवायची असल्यास आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही गोष्टींचा समावेश दैनंदिन जीवनात करावा लागेल. आपल्या त्वचेचा रंग सुधारण्यासाठी काय करावे जाणून घेऊ या.
 
1 अर्धा चमचा लिंबाचा रस दोन चमचे पुदीनाच्या रसात मिसळा आणि चेहरा आणि माने वर लावा. 10 मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
 
2 एक चमचा मधात दुपट्टीने बदामाची पूड आणि लिंबाचा रस मिसळा.हे पॅक चेहऱ्यावर लावून मॉलिश करा. 10 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ  पाण्याने धुवून घ्या.
 
3 हरभराडाळीच्या पिठात लिंबाचा रस आणि दूध घालून फेस पॅक बनवा. ते चेहऱ्यावर लावा.कोरडे झाल्यावर चेहरा धुवून घ्या या मुळे उन्हात भाजलेली त्वचा आणि मृत त्वचा बरी होण्यात मदत मिळेल.
 
4 चेहरा उजळून मुरुमांपासून मुक्ती मिळवायची असल्यास मेथीच्या पानांची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटा नंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या.
 
5 मुळा वाटून त्याची पेस्ट बनवा आणि ते चेहऱ्यावर लावा. या फेस पॅक मुळे त्वचेचा रंग उजळेल.