शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

जमशेदजी टाटा यांच्या दुर्मिळ घड्याळ्याचा लिलाव होणार

टाटा समुहाचे प्रमुख जमशेदजी टाटा यांच्या सुमारे  १४० वर्षांपूर्वीच्या घड्याळ्याचा लिलाव होणार आहे.  हॉंगकॉंगमध्ये हा लिलाव होणार असून घड्याळ्याची किंमत  $10,000-$20,000 असू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

१८ कॅरेट पिंक गोल्ड स्वरूपाचे घड्याळ जमशेदजींनी आर्किटेक्ट जेम्स मॉरिस यांना गिफ्ट केले होते. जेम्सने टाटांच्या घराचे काम केले होते. त्याच्या कामावर खूष होऊन हे गिफ्ट देण्यात आले होते. घड्याळ्याच्या मागील बाजूला मॉरिरसाठी लिहलेली काही कौतुकाक्षरे कोरण्यात आली आहेत. १८ कॅरेट सोन्यातील हे घड्याळ पिंक गोल्डमध्ये असल्याने हे दुर्मिळ आहे. अशी माहिती फिलिप्स आशियाचे प्रमुख थॉमस पराझी यांनी दिली आहे. जमशेदजींसाठी बनवले गेलेले घड्याळ हे त्यांच्यासाठी खास तयार केलेले घड्याळ आहे.