बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मार्च 2020 (09:35 IST)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवर 'असा' झाला कोरोनाचा परिणाम

कोरोना व्हायरसचा परिणाम जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवरही झाला आहे. जेफ बेजोस  यांनी एका दिवसांत ७ अब्ज डॉलर गमावले आहेत. शेअर बाजारात आलेल्या या अनिश्चिततेमुळे जेफ बझोस यांची संपत्ती ७ अब्ज डॉलरने कमी झाली आहे. रिपोर्टनुसार, जेफ बेजोस यांची संपत्ती ११७ अब्ज डॉलरवरुन कमी होऊन ११० अब्ज डॉलर इतकी झाली आहे.
 
जेफ बेजोस यांनी गेल्या महिन्यात १.८ कोटी डॉलर गमावले होते. रिपोर्टनुसार, शेअर बाजारात ही अनिश्चितता कोरोना व्हायरसमुळे आली आहे. अमेरिकेतील चार मोठ्या टेक कंपन्या - Apple, Amazon, Microsoft, Alphabet या कंपन्यांना ३२१ अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. हे नुकसान या कंपन्यांना केवळ एका दिवसांत झालं आहे. रिपोर्ट्सनुसार, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांना एका दिवसांत ४ अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे.