गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

अ‍ॅप्पलचे सीईओने केले भारतीय फोटोग्राफरचे कौतुक

अ‍ॅप्पलचे सीईओ टीम कुक यांनी भारतीय फोटोग्राफरने काढलेला एक फोटो ट्विट केला आहे. वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने त्यांनी आयफोनमधून काढलेले पाच फोटो ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये भारतीय फोटोग्राफर वरूण आदित्य याचाही फोटो आहे. 
 
टीम कुक यांनी वरुणच्या या फोटोला सुंदर ओळही दिली आहे. मुळचे भारतीय असलेल्या आदित्य हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. त्यांचे फोटो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनाला ठेवले जातात. कुक यांनी एक फोटो ट्विटरवर टाकत म्हटले आहे की, आम्हाला दर रोज आमच्या ग्राहकांकडून आयफोनवर काढलेल्या फोटोंमुळे प्रेरणा मिळते. हे फोटो पाहून आनंदही होतो. आदित्य यांनी केनियाच्या एंबोसेलीमध्ये हत्तींसोबत इंद्रधनुष्याचा सुंदर फोटो काढला आहे.