गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (15:47 IST)

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आर्थिक घोटाळा

आता बँकेतील घोटाळे उघड होत आहेत. असाच एक घोटाळा उघड झाला आहे.बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असाच एक घोटाळा समोर आला आहे.उद्योगपती अमित सिंगला आणि अन्य व्यक्तींविरोधात  थकीत कर्जा प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रने सीबीआयकडे एफआयआर नोंदवला आहे. आशीर्वाद ग्रुपच्या कंपन्यांनी बँकेकडून 9.5 कोटींचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड न झाल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे आता बँक  चर्चेत आली आहे. 
ANI
 
 

Bank of Maharashtra lodges FIR with CBI against Delhi-based businessman Amit Singla & others, for a loan default. Singla's company Aashirwad Chain Co. had obtained a loan of Rs 9.5 crore from the bank.

  •  
तर दुसरीकडे  ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) या बँकेत   महाघोटाळा झाला आहे. राजधानी दिल्ली येथे  सीबीआयनं एका हिरे व्यापऱ्याविरोधात फसवणूकीची केस दाखल केली आहे. सीबीआयनं कथित महाघोटाळ्याप्रकरणी द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे. त्यामुळे बँका आहेत की घोटाळ्याचे कुरण असा प्रश्न समोर आला आहे.