मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 30 मे 2021 (11:55 IST)

कोरोनाच्या काळात पेट्रोल महागले

मुबंईत पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाली असून आता पेट्रोलने चक्क शंभरी पार केली आहे.मुबंईत पेट्रोल 100 रुपये 19 पैसे,झाले आहे.तर डिझेलचे दर देखील 92 रुपये 17 पैसे झाले आहे.
 
सरकारी इंधन कंपनी ने पेट्रोलच्या दरात लिटरी 26 पैसे तर डिझेल दरात 28 पैसे वाढ करण्यात आली आहे.सध्या राजस्थान,मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात तर पेट्रोलचे दरांनी शंभरी पार केलीच आहे.
 
आता आर्थिक राजधानी मुबंईत देखील पेट्रोल महाग झाले आहे.मुबंईत हे दर पेट्रोल 100 रुपये 19 पैसे,झाले आहे.तर डिझेलचे दर देखील 92 रुपये 17 पैसे झाले आहे.प्रत्येक राज्यात हे दर मूल्यवर्धित कर वेगवेगळे असल्यामुळे वेगवेगळे असतात.
 
दिल्लीत पेट्रोलचे दर 93 रुपये 94 पैसे आणि डिझेल 84 रुपये 89 पैसे आहे.सध्या महाराष्ट्र,राजस्थान आणि मध्यप्रदेशात इंधन दर जास्त आहे.ही इंधन दर वाढ 4 मे पासून 15 वेळा वाढविली आहे. 
त्यात पेट्रोलचे दर 3 रुपये 54 पैसे दर डिझेल दर 4.16 पैसे वाढवले आहे.
 
पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या वेळी ही दर वाढ रोखली होती.ही दरवाढ सुमारे 18 दिवस रोखण्यात आली होती.
राजस्थानात गंगानगर जिल्ह्यात पेट्रोल प्रति लिटर 104.94 पैसे असून डिझेल 97.79 पैसे आहे.