सोमवार, 3 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified गुरूवार, 10 जून 2021 (16:18 IST)

Gold price today: सोनं स्वस्त झाले, चांदीचे दरही खाली, दहा ग्रॅमची किंमत तपासा

सोने खरेदी करणार्यांवना दिलासा मिळाल्याची बातमी आहे. आज सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दर 0.2 टक्क्यांनी कमी होऊन 49,020 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. याखेरीज चांदीच्या दरातही घसरण सुरू आहे. चांदी (Silver Price today) 0.5 टक्क्यांनी घसरून 71,507 रुपये प्रति किलो झाली. मागील व्यापार सत्रात त्याच वेळी सोन्याच्या किमतींमध्ये 0.9 टक्क्यांची वाढ दिसून आली होती.
 
आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाले तर येथेही सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. अमेरिकेतील सोन्याचा व्यापार प्रति औंस 1.56 डॉलर घटून 1,887.09 डॉलरवर बंद झाला. त्याचबरोबर चांदी $ 0.09 च्या घसरणीसह 27.72 डॉलरच्या पातळीवर व्यापार करीत आहे.