शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑक्टोबर 2019 (09:14 IST)

कार विक्रीचा उच्चांक, मुंबई आणि गुजराथ मध्ये एकाच दिवशी २०० मर्सिडीज विक्री

देशात सध्या आर्थिक मंदीमुळे ग्राहकांची कमी झालेली खरेदी यावरून आता सुरु होत असलेल्या सण-उत्सवांच्या काळात वाढत असल्याचं दिलासादायक चित्र समोर येते आहे. आलिशान कार निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझने देशात एकाच दिवसात 200 पेक्षा जास्त कारची विक्री केली असून, मुंबई, गुजरात इतर ठिकाणी एकाच दिवशी तब्बल 200 पेक्षा जास्त कार विकेल्या आहेत, विशेष म्हणजे विकण्याचा विक्रम करण्यात आल्याचं मर्सिडीज बेंझकडून स्पष्ट केले आहे. दसरा सणाच्या मुहूर्तावर तब्बल 125 पेक्षा जास्त कार एकट्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतच खरेदी केल्या असून, 74 कार गुजरातमध्ये विकण्यात आल्या आहेत. 
 
मर्सिडीज मध्ये C-Class आणि E-Class या सेडानकडे ग्राहकांचा जास्त ओढा दिसून येतोय तर जीएलसी व जीएलई या एसयूव्हीनेही बाजारात चांगली कामगिरी केली असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले आहे.