एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलणार
सत्तर वर्षांत पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषणा केली. मुंबई सेंट्रलमधल्या मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या 31 विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश वितरण सोहळा होणार आहे.
एसटी महामंडळात सुमारे एक लाख कर्मचारी काम करतात. दरवर्षी त्यांना एसटी महामंडळाकडून गणवेशासाठी कापड दिलं जायचं. ते कापड पसंत 'न' पडल्यामुळे कर्मचारी आपल्या सोयीने गणवेशाचे कापड खरेदी करुन गणवेश स्वतः शिवून घेतात.
आता पहिल्यांदाच रावते यांनी एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांना तयार गणवेश देण्याची संकल्पना मांडली. केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या 'राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजि संस्थान' (National Institute of Fashion technology 'NIFT') या संस्थेला एसटी कर्मचाऱ्यांचे नवीन गणवेश 'डिझाईन' तयार करण्यासाठी पाचारण केलं.