दिवाळीच्या तोंडावर प्रचंड महागाई, सर्वच वस्तूंचे भाव कडाडले
गणेशोत्सव, नवरात्र यापाठोपाठ दिवाळीही जल्लोष आणि उत्साहात साजरी करण्याच्या प्रयत्नांन असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे महागाईने खिसे रिकामे होऊ लागले आहेत.
दिवाळी आठ दिवसांवर आली असताना शनिवारची सुट्टी साधून बाजारपेठांमध्ये गर्दी करणाऱ्या नागरिकांना या महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. डाळी, धान्य, फराळासाठी लागणारे साहित्य, भाज्या, तेल या सगळ्यांचे भाव चढे असल्याने दिवाळीचा गोडवा महाग होत आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
40 रुपये प्रतिकिलो असलेले टोमॅटो सध्या 60 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. सर्वच भाज्या किमान 80 रुपये प्रतिकिलोहून अधिक दराने विक्रीस आहेत. बटाटे व कांद्याच्या दरांतही सरासरी 20 टक्के वाढ झाली आहे. दूध व साखर, दोन्ही महागल्याने मिठाईची दरवाढ निश्चित आहे.
Published By- Priya Dixit