सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

रघुराम राजन यांचा बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी विचार

रघुराम राजन यांच्या नावाचा विचार बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी केला जातो आहे असे यु.के. मधील ‘फायनान्शिअल टाइम्स’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर पुढच्या वर्षी निवृत्त होणार आहेत.
 
रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अर्थ तज्ज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ते वयाच्या ४० व्या वर्षी प्रमुख झाले. २००५ मध्ये त्यांनी शोध निबंध सादर करून आर्थिक मंदीचा अंदाजही व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र तीन वर्षांनी राजन यांनी व्यक्त केलेले भाकीत खऱे ठरले. अमेरिकासह जागतिक अर्थव्यवस्थेला आर्थिक मंदीचा फटका बसला. आता याच रघुराम राजन यांचे नाव बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी चर्चेत आहे. राजन यांच्यासोबतच श्रिती वडेरा या ब्रिटनमधील राजकारणी आणि अर्थतज्ज्ञ असलेल्यांचेही नाव चर्चेत आहे.  याआधीही त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर वारंवार टीका केली आहे.