रिलायन्स रिटेलने 24,713 कोटींत विकत घेतलं फ्यूचर ग्रुपचा व्यवसाय
आरआरव्हीएल म्हणजे Reliance Retail Ventures Limited ने फ्यूचर ग्रूपचा रिटेल, होलसेल लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊस व्यवसाय 24,713 कोटींत विकत घेत असल्याचं जाहीर केलं. या मेगा डीलमुळे कंपनीची रिटेल व्यवसायातील स्थितीला अजून बळ मिळेल.
किशोर बियानी यांच्या फ्यूचर ग्रूपशी मुकेश अंबानींच्या रिलायन्सने 24,713 कोटी रुपयांचं डील केलं आहे. या योजना अंतर्गत रिटेल आणि होलसेल उपक्रम रिलायंस रिटेल अँड फॅशन लाइफस्टाईल (RRFLL) मध्ये स्थानांतरित केलं जात आहे. ही RRVL ची पूर्ण स्वामित्व असलेली सहाय्यक कंपनी आहे. लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग अंडरटेकिंगला आरआरव्हीएलला सोपवण्यात येत आहे.
रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेडची डायरेक्टर ईशा अंबानी यांनी म्हटले की फ्यूचर ग्रुपच्या प्रसिद्ध ब्रँड्ससह त्यांचे व्यावसायिक ईको सिस्टमला संरक्षित करण्यात आम्हाला आंनद वाटत आहे. भारतात आधुनिक रिटेलच्या विकासात ही महत्त्वाची भूमिका ठरेल. लहान व्यापारी, किराना स्टोअर्स आणि मोठे उपभोक्ता ब्रँड्सच्या सहभागाच्या आधारे रिटेल सेक्टरमध्ये विकासाची वेगाने होईल अशा विश्वास व्यक्त करत म्हटलं आम्ही देशभरात आपल्या उपभोक्तांना चांगले मूल्य प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत.
फ्यूचर ग्रूप रिलायन्समध्ये आल्यानंतर आता RIL देशातला सर्वांत मोठा रिटेल उद्योग ठरू शकतो. या नव्या करारामुळे देशभरातली 1800 फ्यूचर रिटेल स्टोअर्स रिलायन्सला मिळणार आहेत. सध्या रियायन्सची अमेझॉनशी सुरू असलेली ई कॉमर्सची स्पर्धा यामुळे आणखी तगडी होईल.
रिलायन्स आणि फ्यूचर ग्रूप दरम्यान झालेल्या कराराप्रमाणे, बिग बझार, फूड हॉल, निलगिरीज, FBB, Cetral, ब्रँड फॅक्टरी, हेरिटेज फूड हे सगळे रिटेल ब्रँड रिलायन्सकडे येतील.