शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (15:25 IST)

मोठी बातमी, पुढील महिन्यात महाग होऊ शकतं टर्म इंश्योरेंस, जाणून घ्या का आवश्यक आहे टर्म इंश्योरेंस

वीमा कंपन्यांनी 1 एप्रिलपासून टर्म इंश्योरेंस प्रीमियम महाग करण्याची तयारी केली आहे. जर आपण आतापर्यंत टर्म प्लान केले नसेल तर नवीन वित्त वर्षात आपल्याला टर्म इंश्योरेंस 10 ते 15 फीसदी महाग मिळू शकतं. चला जाणून घ्या टर्म प्लान संबंधी 10 खास गोष्टी...
 
कुंटुबाला पुरेशी वित्तीय सुरक्षा : टर्म प्लानचं मूळ उद्देश्य वीमा कव्हर देणे आहे आणि या योजनेत प्रीमियमचा संपूर्ण भाग विमा संरक्षणात जाईल ज्याद्वारे अत्यंत कमी प्रीमियमवर पुरेसा विमा संरक्षण मिळू शकतो. म्हणूनच, कुटुंबास पुरेशी आर्थिक सुरक्षा देण्यासाठी एक मुदत योजना घ्यावी.
 
पूर्ण पैसा वीमा कव्हरमध्ये : जीवन विमाचे एंडोमेंट प्लान, मनी बॅक प्लान, यूलिप प्लान इतरमध्ये प्रीमियमचा जास्तीत जास्त वाटा गुंतवणूकीला जातो, ज्यामुळे विमा संरक्षण कमी उपलब्ध होत जेव्हाकी टर्म प्लानमध्ये पूर्ण पैसा विमा कव्हरमध्ये जातं.
 
कमी खर्चा अधिक सुरक्षा: Term plan आपल्याला कमी खर्चात अधिक सुरक्षा प्रदान करतं. जर आपल्याला 40 वर्षाच्या वयात 50 लाखाचा विमा हवा असल्यास यासाठी आपल्याला सुमारे 8500 ते 10000 रुपए प्रतिवर्ष खर्च पडेल.
 
कोणी घ्यावं टर्म प्लान : कुटुंबातील त्या सर्व सदस्यांनी टर्म प्लान घेतलं पाहिजे ज्यांच्या कुटुंब आर्थिक रुपाने निर्भर असेल. आपण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 10 पट विमा खरेदी केला पाहिजे. टर्म प्लान 10, 15, 20, 25 किंवा 30 वर्षांसाठी घेतला जाऊ शकतो.
 
टर्म प्लान प्रीमियम : टर्म प्लान प्रिमियम आपले वय, कव्हरेजची रक्कम आणि पॉलिसीची अवधी यावर निर्भर करतं. जर कोणी व्यक्ती आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच टर्म प्लान घेत असेल तर त्याची अवधी जास्त असेल तर प्रीमियम कमी येईल आणि वयाच्या 40 व्या वर्षी प्लान करत असाल तर अधिक पैसे चुकवावे लागतील. 
 
या प्रकारे निवडा प्लान : टर्म प्लान निवडताना अनेक लोक केवळ किमान प्रीमियम प्लान यावर भर देतात. बेहतर टर्म प्लान निवडताना आम्हाला किमान प्रीमियमसह इंश्योरेंस कंपनीचे सालवेंसी रेशो, क्लेम सेटलमेंट, ग्रिवियेन्स हँडलिंग इतर गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे.
 
रायडर्स वर देखील लक्ष द्या : टर्म प्लानसह अनेक रायडर्स विकले जातात. यात क्रिटिकल इलनेस, प्रीमियमहून सूट, एक्सीडेंटल डेथ, परमानेंट किंवा पार्शियल डिसेबिलिटी आणि इन्कम बेनिफिट रायडर सारखे प्रॉडक्ट्स सामील आहेत. हे केवळ विमासह खरेदी करता येतात.
 
नॉमिनीची माहिती द्या : टर्म प्लान घेताना आपल्याला नॉमिनीची माहिती देणे आवश्यक आहे. या स्थितीत पैसा त्या वयक्तीला मिळतो ज्याला आपण नॉमिनी म्हणून नियुक्त केले आहे. सोबतच आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही याबद्दल माहिती असावी की आपण टर्म प्लान केले आहे.
 
लोक का घेत नाही टर्म प्लान : बाजारात टर्म प्लानच्या प्रती लोकांमध्ये जागरूकता नसणे मोठे कारण आहे. टर्म प्लानमध्ये प्रीमियम कम असल्यामुळे याद्वारे एजेट्सला मिळणारे कमीशन खूप कमी असतं सोबतच यात कुठलही रिटर्न मिळत नाही. अशात इतर प्लान जसे यूलिप किंवा मनी बॅक यात विम्यासह रिटर्न देखील मिळतं.
 
मॅच्योरिटीवर रक्कम मिळत नाही : टर्म प्लानचा पूर्ण पैसा विमा कव्हरमध्ये जातो म्हणून यात प्लानच्या मॅच्योरिटीवर पॉलिसीधारकास पैसे मिळत नाहीत. हेच या प्लानचं ड्रा बैक आणि विशेषता दोन्ही आहे.