बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (14:48 IST)

मस्क्युलर ‘रॉकेट 3 जीटी'

‘ट्रायम्फ'ने जबरदस्त बाइक भारतात उतरवली आहे. ही कंपनीची आजवरची सर्वात दमदार बाइक असल्याचं बोललं जात आहे. बाइकची किंमत अधिक असली तरी यात बर्याच सोयीही आहेत.
 
‘रॉकेट 3 जीटी' असं या बाइकचं नाव आहे. ‘रॉकेट 3 जीटी' मस्क्युलर आणि अॅग्रेसिव्ह बाइक असल्याचं कंपनीच म्हणणं आहे. ही बाइक आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अधिक टॉर्क जनरेट करत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या बाइकमध्ये 2458 सीसी इनलाइन तीन सिलिंडर इंजीन आहे. बाइकमध्ये रोड, रेन, स्पोर्टस आणि कम्फर्टेबल असे चार मोड्‌स देण्यात आले आहेत. ही बाइक तरुणाईला नक्कीच आवडेल.