सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (11:20 IST)

मानसी नाईक लवकरच विवाहबंधनात अडकणार, शेअर केले ग्रहमख पूजेचे फोटो

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईकच्या घरी लगीन घाई सुरू झाली आहे. तिने घरी ग्रहमख पूजा केली असून पूजेचे फोटो शअेर केले आहे. 
 
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता. मानसी आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत लग्न बंधनात अडकणार आहे. मागे तिने सोशल मीडियावर रिलेशनशीपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. प्रदीप खरेरा हा बॉक्सर तर आहेच, शिवाय मॉडेल आणि अभिनेताही आहे. प्रदीपनं अनेक स्पर्धा जिंकल्या असून मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स २०१८ चा तो विजेता आहे. 
 
मानसीने हिंदीमध्ये कॅप्शन लिहित फोटो शेअर केला आहे-
मन्नतो से मांगी हुई जन्नत की दुनिया से आई हुं ..!
में अपनी पापा की सहजादी हुं 
ना इसलिए बहुत किस्मत वालों को अपना हमसफ़र बनाऊँगी
 
ग्रहमख या विधीपासूनच मानसीच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. मानसीच्या चाहत्यांना तिला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

Photo: Instagram