गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (10:01 IST)

ICC कडून तीन बांगलादेशी खेळाडूंसह दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई

रविवारी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने पाकिस्तानवर मात करत विजेतेपद पटकावलं. मात्र यानंतर बांगलादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये वाद झाला. 
 
आयसीसीने या प्रकरणात व्हिडीओ फुटेज तपासत वाद घालणाऱ्या 5 खेळाडूंवर कारवाई केली आहे. ICC कडून तीन बांगलादेशी खेळाडूंसह दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे.
 
बांगलादेशकडून तौहीद हृदॉय, शमिम हुसैन आणि रकीब उल-हसन तर भारताकडून आकाश सिंह आणि रवी बिश्नोई यांच्यावर कारवाई केली गेली आहे. या पाचही खेळाडूंवर आयसीसीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी 4 ते 10 सामन्यांची बंदी घालण्यात आलेली आहे. 
 
सामना रंगतदार झाला असला तरी खेळाडूंनी मैदानात असताना शिस्तीने वागणं, प्रतिस्पर्ध्यांचं अभिनंदन करणं हे महत्वाचं असतं. मात्र अंतिम सामन्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे सर्व नियमांचा भंग झाला. यामुळे ICC कडून कारवाई करण्यात आली.