रविवार, 1 ऑक्टोबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑगस्ट 2020 (09:03 IST)

बातमी उपयोगाची, भारतीय रेल्वेनेही नोकरीची संधी

भारतीय रेल्वेनेही नोकरीची संधी दिली असून ४ हजार ४९९ जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे ही भरती विना परिक्षा केली जाणार आहे. तसेच उमेदवारांची निवड १० वीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.
 
इच्छुकांसाठी या आहेत महत्त्वाच्या गोष्टी –
एनएफआर आरआरसी रिक्रुटमेंट २०२० साठी अर्ज करण्याची ही http://rrcnfr.co.in लिंक
भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परिक्षा होणार नाही
उमेदवारांची निवड १० वीच्या गुणांच्या आधारे केली जाणार
ऑनलाईन अर्जाची सुरूवात १६ ऑगस्ट २०२०
अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२०
या भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची १० वी परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी
कमीतकमी ५० टक्के गुण असावेत
उमेदवार आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असावा
उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्ष असावे
आरक्षणासाठी वयामध्ये सूट दिली जाणार आहे
१ जानेवारी २०२० नुसार वय पाहिले जाईल
एससी/एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही
अन्य वर्गांसाठी १०० रुपये शुल्क आकारले जाईल.