मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

काश्मिरी फिरन ठरतोय बेस्ट फॅशन

काश्मीरला फिरायला गेल्यावर काश्मिरी पारंपरिक गुडघ्यापर्यंत लांबी असलेला पोषाख घालून तुम्हीही फोटो काढला असेल. या लांबलचक झब्ब्याला  'फिरन' म्हटले जाते. सध्या हिवाळ्यातील फॅशनमध्ये काश्मिरी फिरनची चर्चा सुरू आहे. नवीन डिझाईनच्या जोडीने काश्मीर खोर्‍यातील हा पोशाख आपले सौंदर्य परत आणून हिवाळ्यात उबदार व फॅशनेबल पेहेराव ठरत आहे. काश्मिरी स्त्रिया नक्षीकाम केलेला, लांब व सैल बाह्यांचा फिरन घालतात. पुरुष प्लेन, रुंद बाह्यांचा, उघड्या गळ्याचा फिरन घालतात. बाजारात विविध प्रकारचे आकर्षक कपडे उपलब्ध असूनही काश्मिरी लोक कडाक्याच्या थंडीत फिरन घालणेच पसंत करतात. अलीकडच्या काळात फिरनमध्ये फार मोठे बदल झाले आहेत. नवीन डिझाईन व एम्ब्रॉडरीच्या समावेशाने फिरनचे स्वरूप अधिक आकर्षक बनले आहे. काश्मीरमध्ये हिवाळ्यात ऊब निर्माण करण्यासाठी मातीच्याभांड्याचा शेकोटीप्राणे वापर केला जातो. याला 'कांगरी' म्हणतात. या कांगरीला हाताळताना फिरन अत्यंत सुरक्षित वस्त्र ठरते.