सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. गुरूमंत्र
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (18:55 IST)

मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी या सवयींचे अनुसरणं करा

आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या जबाबदारीमुळे आपल्याला असे वाटत असेल की आपण गोष्टींना विसरत आहात आणि मेंदू पूर्वीप्रमाणे काम करत नाही तर या साठी काही सोपे उपाय किंवा सवयींआहेत ज्यांना अवलंबवून आपण मेंदूची शक्ती पुन्हा वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या त्या सवयी बद्दल. 
 
1 कोडे सोडवा- 
हे आपल्या मेंदूला तरुण ठेवण्यात आणि प्रश्नांची उत्तरे सोडविण्यात मदत करतात. असं म्हणतात की नियमितपणे कोडे आणि सुडोकू खेळणाऱ्या लोकांचे मेंदू तरुणाच्या मेंदू प्रमाणे काम करते. या मागील कारणे असे आहे की हे आपल्या मेंदूला ताजेतवाने ठेवतात. सुडोकू खेळल्याने अल्झायमर होण्याचा धोका कमी होतो.
 
2  यादी शिवाय खरेदी करा-
हे आपल्या स्मरणशक्तीला वाढविण्यात प्रभावी आहे. आपण यादी न घेता दुकानावर जावे आणि मेंदूवर जोर देत सामान खरेदी करावे. असं केल्यानं मेंदू सक्रिय होतो. हे आपल्या मेंदूला जागृत करण्याचे काम करतो.
 
3 नवीन पद्धत अवलंबवा-
 हे ऐकण्यात विचित्र वाटेल पण हे प्रभावी उपाय आहे, प्रशिक्षित हाता ऐवजी  त्या हाताचा वापर करा ज्याचा आपण जास्त वापर करत नाही. आपण ज्या हाताने दररोज काम करता त्या हाता ऐवजी दुसऱ्या हाताचा वापर करावा. जसं की दररोज ब्रश करणे, असं केल्याने मेंदूचा दुसरा भाग सक्रिय होतो.
 
4 गाणे ऐका-
गाणे ऐकल्याने विचार करण्याची क्षमता आणि एकाग्रता वाढते.संशोधनात आढळून आले आहे की व्यायाम करताना गाणे ऐकल्याने एकाग्रता वाढते. संगीत एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्यात मदत करते. या मुळे ज्ञान वाढते.
 
5 व्हिटॅमिन डी घ्या-
सूर्य आपल्या मेंदूला सक्रिय करत. उन्हात बसावं. या मुळे व्हिटॅमिन डी मिळते जे आपल्या मेंदूला सक्रिय बनवते. या मुळे मेंदू चांगल्या प्रकारे काम करत.
 
6 टेट्रिस खेळ खेळा-
मेंदूला तीक्ष्ण बनवतात टेट्रिस खेळ. या मुळे लोकांचे मेंदू जलद गतीने काम करतो. हे खेळ खेळणाऱ्यांचे मेंदू खेळात नवीन लेव्हल वर जाण्यासाठी नवीन मार्ग शोधतात . त्या मुळे त्यांचे मेंदू अधिक सक्रिय असतात.असं म्हणतात की टेट्रिस खेळ खेळणाऱ्याची स्मरण शक्ती अधिक चांगली असते.
 
7 दररोज नवीन शिकण्याची इच्छा-
आपल्या मेंदूला विस्तारित करा, दररोज सवय करा झोपण्याच्या पूर्वी नवीन विषयाबद्दल माहिती मिळवायची. नवीन काम, रेसिपी या मुळे आपल्या मेंदूला चालना मिळेल आणि नवीन शिकण्याची इच्छा होईल. मेंदू सक्रिय राहील.
अशा प्रकारे आपण मेंदूची शक्ती वाढवू शकता.