बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

उन्हाळ्यात रात्री अंघोळ करा, गारवा आणि फायदा दोन्ही मिळवा

अनेक लोकांना दिवसातून दोनदा अंघोळ करण्याची सवय असते. परंतू काही लोक 24 तासात केवळ एकदाच अंघोळ करतात तर त्या लोकांसाठी सल्ला आहे की उन्हाळ्यात रात्री अंघोळ करा आणि त्यापासून काय फायदे होतात ते ही बघा-
 
1. दिवसभर व्यस्त राहिल्यामुळे शरीरावर घाण जमते, रात्री अंघोळीमुळे स्वच्छ वाटतं. अंघोळ करून झोपणे आरोग्य तसेच सौंदर्यासाठी देखील उत्तम आहे. उन्हाळ्यात गार पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा उजळते आणि त्वचेवरील डाग नाहीसे होतात.
 
2. अनेकदा अधिक थकवा आणि ताण यामुळे झोप येत नातही. रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने थकवा मिटतो आणि चांगली झोप येते.
 
3. रात्री अंघोळ केल्याने शरीराची रोग प्रतिरोधक क्षमता वाढते आणि आपल्या अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.
 
4. थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन योग्य रित्या झाल्याने हृदयाचे आरोग्य उत्तम राहतं.
 
5. हाय ब्लड प्रेशरची समस्या असल्यास गरम पाण्याने अंघोळ करावी. याने शरीरातून घाम निघून शरीराचं तापमान सामान्य राहण्यास मदत मिळते.