शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मे 2020 (12:56 IST)

दररोज खा काकडी, फायदे जाणून नक्कीच आहारात सामील कराल

असे म्हणतात की रत्नांमध्ये हिरा आणि भाज्यांमध्ये खीरा म्हणजेच काकडी. होय, आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासह त्वचेच्या सौंदर्याची काळजी घेण्याचे काम देखील काकडी करू शकते. यात अनेक मौल्यवान संपत्तीचा खजिना आहे. ह्यामध्ये कोणते वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊया आणि जाणून घेऊया त्याचे फायदे....
 
1 सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे ह्यात 80 टक्के पाणी असतं. काकडी तहान शमवते आणि शरीरातील पाण्याच्या कमतरतेला पूर्ण करते. काकडी खाल्ल्यावर शरीराला पुरेसे पाणी मिळतं.
 
2 शरीरातील अंतर्गत अंग आणि त्वचेची पूर्णपणे स्वच्छता करते. या शिवाय काकडी उन्हामुळे करपलेल्या त्वचेला आराम देते तर त्वचेची टॅनिंग सुद्धा कमी करते.
 
3 काकडीचा उत्कृष्ट गुणधर्म आहे डोळ्यांना थंडावा देणं. फ्रीजमध्ये गोठवून ठेवलेले याचा रसाचे थंड चौकोनी तुकडे डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांचा थकवा दूर होतो. रसाचे थंड तुकडे डोळ्यांच्या पापण्यांवर ठेवल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो आणि डोळ्याखालील काळ्या डागांपासून सुटका होते.
 
4 काकडी खाल्ल्याने छातीतली जळजळ कमी होते. शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढण्यासाठी मदत करते. काकडी आतड्याची चांगल्या प्रकारे स्वच्छता करते.
 
5 आपल्या दररोजच्या आहारामध्ये कोणते न कोणते जीवनसत्त्वं घेणे फार महत्त्वाचे आहे. आपल्याला व्हिटॅमिन ए, बी आणि सी आपल्याला नियमाने घेणे गरजेचे असते. काकडी आपल्याला दररोजचे व्हिटॅमिन्स देते. काकडीच्या सालींमध्ये देखील व्हिटॅमिन सी आढळते.
 
6 स्वच्छ आणि तजेलदार मऊ त्वचा हवी असल्यास आपल्याला काकडीशी मैत्री करायला हवी. काकडीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सिलिकॉन जास्त प्रमाणात असतं. हे खनिज त्वचेसाठी खूप महत्त्वाचे आहे.
 
7 काकडीही वजन कमी करते. ज्यांना आपले वजन कमी करायचं आहे त्यांनी सूप आणि सॅलडमध्ये काकडी खावी. कारण काकडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं आणि  कॅलरी कमी प्रमाणात असते. म्हणून पोटाला लवकरच तृप्त करते.