बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

शरीरातील inner dryness दूर करण्यासाठी या काही गोष्टींचे सेवन करा

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण सगळं काही करतो. त्वचा कोरडी असल्यावर बाहेरून त्वचेची काळजी घेण्यासह आतून देखील शरीराला आपल्या आहारात बदल करून त्वचा हायड्रेट करण्याची गरज आहे. जर आपण देखील शरीरातील inner dryness दूर करू इच्छिता तर या गोष्टींचे सेवन करण्यास सुरु करा.
 
कोरड्या त्वचेसह इतर समस्यांमध्ये कोरफडाचा रस इतर समस्यांपासून मुक्त करतो. कोरफडात अँटी ऑक्सीडेन्ट आणि अँटी बेक्टेरियल गुणधर्म आढळतात. तसेच या मध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ आणि व्हिटॅमिन बी आढळते. जे त्वचेला आतून मऊ करते.  
 
1 अवाकाडो-
एक कप शुद्ध अवाकाडोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ आणि व्हिटॅमिन ए आढळते, जे त्वचेच्या पेशींना हायड्रेट ठेवण्यात मदत करतो.  
 
2 अंडी -
 व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन इ, कॅल्शियम आणि प्रथिन अंडी मध्ये मुबलक प्रमाणात आढळते. ह्याच्या सेवनाने रुक्ष आणि कोरडी त्वचेपासून आराम मिळतो.  
 
3 दही -
दह्यामध्ये अनेक प्रकाराचे घटक आढळतात. ज्यांना खाल्ल्यानं शरीराला फायदा होतो. दह्यात कॅल्शियम, प्रथिन आणि व्हिटॅमिन असतात. दह्याचे नियमित सेवन केल्यानं त्वचेला मऊसर बनविण्यात मदत मिळते.  
 
4 पाणी-
दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायल्यानं देखील त्वचेचा रुक्ष आणि कोरडेपणा कमी करण्यात मदत मिळते. जर आपण दररोज नियमितपणे 8 ते 10 ग्लास पाणी पिता, तर त्वचेचा कोरडेपणा आणि रुक्षपणा नाहीसा होईल, तसेच त्वचा देखील चकचकीत होईल. हे शरीरातील थंडावा राखून उष्णतेचा दाह कमी करतो. तसेच पचनासाठी देखील फायदेशीर आहे. पाण्याचे नियमित सेवन केल्यानं शरीरातील कोरडेपणा नाहीसा होतो.  
 
5 हिरव्या पालेभाज्या-
हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यानं शरीरातील कोरडेपणा नाहीसा होतो. ब्रोकोली, पानकोबी आणि फूलकोबी मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते तसेच फायबर देखील मुबलक प्रमाणात आढळत. जे त्वचेसाठी फायदेशीर आहे.  
 
5 सुकेमेवे -
सुकेमेवे आपल्या आहारात समाविष्ट करा, जसं की बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू, जे आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. हे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.  
 
6 काकडी- 
काकडीचे सेवन केल्यानं शरीरातील कोरडेपणा कमी होतो. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यात मदत करतात.